रिपोर्टिंग करतांना ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्युची घटना कॅमेऱ्यात
Administrator
MaxMaharashtra
Published on May 8, 2019
रिपोर्टिंग करतांना ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्युची घटना कॅमेऱ्यात
दैनंदिन पत्रकारिता करतांना पत्रकारांना वेगवेगळे अनुभव येत असतात. मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कौस्तुभ खातू आज सायंकाळी (८मे) वरळीतल्या आरे कार्यालयाबाहेर वार्तांकन करत होते. वार्तांकनाचं चित्रिकरण सुरू असतांना एक ज्येष्ठ नागरिक कार्यालयाच्या गेटबाहेरून थोडं अंतर चालल्यावर अचानक खाली कोसळले. त्यानंतर लोकांनी गर्दी केली. थोड्याच वेळात पोलिसही घटनास्थळी आले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा प्रतिनिधी कौस्तुभ खातू यांनी पोलिसांना सहकार्य करत ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांच्या वाहनात आणलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना हॉस्पीटलमध्ये आणलं पण तोपर्यंत उशीर झाला होता. ही संपूर्ण घटना मॅक्स महाराष्ट्रच्या कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. मृत झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची ओळख पटलेली नाही. त्यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन सुरू असून त्यानंतरच मृत्युमागचं कारण समजू शकेल, असं पोलिसांनी सांगितलं. या संपूर्ण घटनेची व्हिडीओ क्लिप मॅक्स महाराष्ट्रनं पोलिसांना दिली आहे. अशा प्रकारे कुणीही अडचणीत असेल तर हातातलं काम सोडून माणूसकी दाखवत मदतीचा हात पुढे करा आणि माणूसकीची साखळी वाढवत नेऊया...