घोडेगाव (पुणे): नारोडी (ता. आंबेगाव) येथील श्री मुक्तादेवी विद्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील शताब्दी वर्षानिमित्त विद्यालयात रांगोळी काढण्याची कला या विषयावर राजश्री नितीन भागवत यांनी प्रात्यक्षिका सह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कितीही मोठी आकर्षक रांगोळी काढण्याचे तंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कर्मवीरांची रांगोळी 10 मिनिटात रेखाटली. राजश्री या आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर गेली 7 वर्ष रांगोळी काढतात. स्वच्छतेचा संदेशही त्या रांगोळीच्या माध्यमातून देत आहेत. (व्हिडिओः चंद्रकांत घोडेकर)